कोथरुड

आशिष गार्डन चौक ते गुरुगणेशनगर डीपी रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा ; वाहतूक विभागाकडे अल्पना वरपे यांची मागणी..

कोथरुड : अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल आशिष गार्डन चौक ते गुरुगणेशनगर या टप्प्यातील डीपी रस्त्याचे रुंदीकरण त्या ठिकाणावरील अतिक्रमणे काढून व उर्वरित रहिवासियांचे पुनर्वसन करून पूर्ण करण्यात आले आहे. या ठिकाणावरील रस्ता दुभाजकाचे काम देखील पूर्ण होत आले आहे. परंतु रुंदीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर अनधिकृतपणे छोटी मोठी वाहने मोठ्या प्रमाणावर लावली जात असल्याने रस्ता वाहतुकीसाठी वापरात आणता येत नसल्याने योग्य ती उपाययोजना करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी नगरसेविका अल्पना वरपे यांनी केली आहे.

या संदर्भातील पत्र वरपे यांनी कोथरुड वाहतूक विभागाला दिले आहे. सध्या हा रस्ता तयार झाला असतानाही रस्त्यावर लागणारी बेशिस्त वाहने, रस्त्याच्या कडेने पडलेले सामान यामुळे रस्ता वाहतुकी साठी वापरता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी वाहतुक कोंडी होऊन नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे व अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

आम्ही लोक प्रतिनिधींनी महापालिकेकडे पाठपुरावा करून येथील रस्ता रुंदीकरणा चा अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न सोडवला आहे. रस्ता तयार झाला असून त्याचा वापर आता वाहतुकीसाठी होणे आवश्यक आहे त्यामुळे वाहतूक पोलीस प्रशासनाने याबाबत आता योग्य ते नियोजन करणे आवश्यक असल्याचे वरपे यांनी म्हंटले आहे.

हा रस्ता त्वरित वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा व  पार्किंग करिता P1- P2 पद्धत राबविण्यात यावी. वाहतूक नियोजना करिता कायमस्वरूपी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात यावी. अशी मागणी वरपे यांनी पत्राद्वारे केली आहे.

Img 20211129 wa0128
Img 20211207 wa00072165133909860442855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये