लहान मुलांच्या लसीला DGCI ची मान्यता ; लवकरच सुरू होणार लसीकरण…

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DGCI ने लहान मुलांसाठीच्या कोरोना लसीला आता मंजुरी दिली आहे. 18 वर्षाच्या पुढील वयोगटासाठी झालेल्या लसिकरणामुळे कोरोना आटोक्यात आणण्यास चांगली मदत झाली आहे. त्यामुळे लहान मुलाचं ही लसीकरण झाल्यास कोरोनाला पूर्णपणे संपवणे शक्य होणार आहे.
2 ते 18 वर्षांच्या मुलांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन
लस दिली जाऊ शकणार आहे. परंतु लहानमुलांना देण्यात येणाऱ्या लसीबाबत लोकांच्या मनात असलेल्या शंकांचं निरसन तज्ज्ञांकडून होणे आवश्यक आहे.
ही लस देण्याची सुरुवात लवकरच करण्यात येणार आहे.
त्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन गाईडलाईन्स बनवल्या जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लसीकरण मोहीमेला ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी ज्यांना अन्य व्याधी, कॅन्सर, अस्थमायासारखे गंभीर आजार आहेत, त्यांना त्या मुलांना आगोदर लस दिली जाणार आहे.




