केंद्रातील भाजप सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पुणे शहरात २०० हुन जास्त सेवा कार्यक्रम : जगदीश मुळीक

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि सेव्ह द चिल्ड्रेन च्या वतीने दिव्यांगाना एक हात मदतीचा
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला आज ७ वर्षे पूर्ण झाले. या ७ वर्षात नरेंद्र मोदी यांनी देशात आमुलाग्र बदल घडविले व देशाला प्रगतीपथावर नेले, हे करत असताना त्यांच्या कार्याची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली असे भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले. More than 200 service programs in Pune city on the completion of seven years of BJP government at the Center: Jagdish Mulik
क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि सेव्ह द चिल्ड्रेन च्या वतीने आज दिव्यांगाना एक हात मदतीचा ह्या उपक्रमा अंतर्गत किराणा मालाची मदत देण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी शहर सरचिटणीस दीपक पोटे, गणेश घोष, राजेश येनपुरे, संघटन मंत्री रवी अनासपुरे, शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, सेव्ह द चिल्ड्रेन संस्थेचे हरीश वैद्य,स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर,प्रवक्ता धनंजय जाधव, चिटणीस प्रशांत हरसुले, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, कुलदीप साळवेकर, बाळासाहेब धनवे, निलेश गरुडकर, प्राची बगाटे, युवा मोर्चा अध्यक्ष सौरभ अथनीकर, ओ बी सी आघाडी अध्यक्ष रमेश चव्हाण, रामदास गावडे, संगीता आदवडे, जयश्री तलेसरा, माणिक दीक्षित, आय टी सेल च्या संयोजिका कल्याणी खर्डेकर, विठ्ठल मानकर, अपर्णा लोणारे, जागृती कणेकर, विशाल रामदासी, संगीता शेवडे, समीर ताडे आदी उपस्थित होते.

आज केंद्रातील भाजप सरकार ला ७ वर्षे पूर्ण होत आहेत त्याप्रित्यर्थ शहरात आनंदोत्सव न करता गरजूंना मदत करून सेवाभावी उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आणि आज शहरात तब्ब्ल 200 ठिकाणी सेवाभावी उपक्रम होत आहेत नरेंद्र मोदी यांनी समाजातील शेवटच्या घटकपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले आहे त्यानुसारच सेवा सप्ताहाच्या माध्यमातून भाजप चे कार्यकर्ते विविध प्रकल्प राबवत असल्याचे जगदीश मुळीक यांनी स्पष्ट केले.
संदीप खर्डेकर म्हणाले, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे सेवाकार्य अविरत सुरु असून समाजातील उपेक्षित वर्गाला एक हात मदतीचा हा उपक्रम राबविताना शहरातील अनेक दानशूर आमच्या पाठीशी उभे राहिले. ह्या संकट काळात शहरातील नागरिकांच्या संवेदनशीलतेचा परिचय झाला आणि शब्दश: हजारो हात मदतीसाठी पुढे आले हे शहराचे वैशिष्ट्य पुणेकरांनी जपले.



