पुणे शहर

८०० रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी १५० रुग्णांवर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया

चंद्रकांतदादा पाटील यांचा मोतीबिंदूमुक्त कोथरुडचा संकल्प

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मोतीबिंदूमुक्त कोथरुडचा संकल्प केला असून, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुबोध हॉस्पीटलमध्ये ८०० रुग्णांची मोफत डोळे तपासणी करण्यात आली, त्यापैकी १५० रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. 

मोतीबिंदू हे जगभरातील दृष्टीदोषाचे प्रमुख कारण आहे, त्यावर वेळीच उपचार न केल्यास, डोळ्यांचे कधीही भरुन न येणारे नुकसान होऊ शकते. मोतीबिंदू जितका जास्त काळ डोळ्यात असतो, तितका तो सरक्षितपणे आणि प्रभावीपणे काढणे अवघड असते. म्हणूनच लक्षणीय अशा मोतीबिंदूचे लवकरच निदान आणि त्यावर त्वरित उपचार होणे योग्य पद्धतीमध्ये अवश्यक असते. या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील व्यक्तींना अडचणीचे असल्याने, बहुतांश वेळेच अशा घटकातील रुग्ण याकडे दुर्लक्ष करतात.

Img 20240202 wa00034606059587729487622

त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांच्या डोळ्याची योग्य पद्धतीने निगा राखली जावी, यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीदिनानिमित्त मतदारसंघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीराचे आयोजन केले होते.

Screenshot 2024 02 08 13 58 58 104172624598441830192

कोथरुडमधील सुबोध हॉस्पिटलमध्ये या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात एकूण ८०० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यापैकी १५० रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले. या सर्वांवर सोमवार पासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी सर्व रुग्णांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले असून, त्यांच्या कामावर समाधान व्यक्त केले.

Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये