कोथरूडमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव व निर्माल्य संकलन जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन..

कोथरूड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने पर्यावरणपुरक गणेश उत्सव व निर्माल्य संकलन जनजागृती रॅलीचे आयोजन कोथरूड परिसरात करण्यात आले होते.
पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया लि. कंपनी, जनवाणी सहकारी संस्था, सेवा सहयोग फांऊडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने डहाणूकर कॉलनी व लक्ष्मीनगर, कोथरूड गावठाण, गांधीभवन, गणंजय सोसायटी, श्रावणधारा, मंत्री पार्क, भेलकेनगर चौक, शिवाजी चौक, कर्वे पुतळा चौक, डहाणूकर सर्कल, या भागातून पर्यावरण पुरक गणेश उत्सव व निर्माल्य संकलन जनजागृती रॅली काढण्यात आली.
सदर रॅलीमध्ये शाडू व मातीच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापणा करणे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर न करणे, पर्यावरण पुरक गणेश उत्सव साजरा करणे, स्वच्छ व सुंदर परिसर ठेवणे, नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे, नदी व नाल्या मध्ये निर्माल्य न टाकणे, गणेश मुर्तीचे विसर्जन घरच्या घरी करणे, गणेश मुर्तींचे सन्मानपूर्वक दान करणे, गणेश मुर्तीचे नदीच्या वाहत्या पाण्यात विसर्जन न करता महानगरपालिकेच्या कृत्रिम विसर्जन घाटावर विसर्जन करणे तसेच दान व संकलन केंद्रावर गणेश मुर्तीचे दान करणे, जल व वायू प्रदुषण टाळणे, ओला आणि सुका असे निर्माल्याचे वर्गीकरण करणे, प्लॅस्टिकचा वापर टाळणे, सांऊड व स्पिकरचा कर्कश आवाज टाळणे, आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे आदी विषयीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जनजागृती रॅलीमध्ये पत्रके वाटण्यात आली.

लक्षीनगर झोपडपट्टी मध्ये घराघरात जनजागृतीचे पत्रके वाटण्यात आली शिवाय चौका चौकात कोपरा सभा घेऊन नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर रॅलीमध्ये कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे, आरोग्य निरिक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे, मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, कमिन्सचे संपत खैरे, संदीप क्षिरसागर, बाळू दांडेकर यांनी मागदर्शन केले.
सदर रॅलीचे आयोजन महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या जनजागृती रॅलीमध्ये कमिन्स इंडियाचे दिपक बेत्ती, संपत खैरे, संजय गोळे, चंद्रशेखर अरंके, वृंदा देसाई व इतर ८० अधिकारी व कर्मचारी तसेच जनवाणीचे समीर आजगेकर, जयश्री पाटील, जगन्नाथ ढगे, निता नाईक, सेवा सहयोगचे युवराज चाबुकस्वार, तसेच विशेष सहभाग रोट्रॅक क्लब ऑफ सहवासचे किरण इंगळे, व्यापारी संघाचे शशिकांत उभे तसेच लक्ष्मीनगर मधील राजाभाऊ गायकवाड, बाळू दांडेकर, क्रिश डान्स अकॅडमीचे कृष्णा शिंदे व लहान मुले व नागरिक सहभागी झाले होते.
(पहा व्हिडिओ)



