कोथरुड

मजेदार खेळ आणि बक्षीसांची लयलूट..न्यू होम मिनिस्टर ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम कोथरूडमध्ये रंगला..

माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या वतीने आयोजन

कोथरूड : बक्षीसांची लयलूट आणि विविध मजेदार खेळांच्या माध्यमातून न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम कोथरूडमध्ये चांगलाच रंगला. प्रभाग क्रमांक १० मधील महिला भगिनींसाठी माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या वतीने खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

क्रांतीनाना मळेगावकर यांचा “खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम  उजवी भुसारी कॉलनी, येथील स्वा.वि. दा. सावरकर मैदानावर पार पडला. या कार्यक्रमात बालगायिका टिव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांनी या कार्यक्रमाची रंगत वाढवली.

Img 20241020 wa00013699867278209296534

या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त पणे सहभागी होत बक्षीसांची लयलूट केली. या कार्यक्रमात वनिता संजय कावडवार यांनी ई – बाईक, मनीषा त्रिगुणे यांनी फ्रिज, जनाबाई ज्ञानेश्वर काळे यांनी शिलाई मशीन, अनिता सर्जेराव कदम यांनी पीठ गिरणी, दिपाली राजेंद्र भरम यांनी टिव्ही अशी बक्षीसे जिंकली. तसेच १०० महिलांना पैठणी साडी भेट देण्यात आली.

महिला भगिनींना रोजच्या कामातून विसावा मिळावा, विरंगुळा व्हावा, त्यांच्या कलागुणांसाठी व्यासपीठ मिळावं या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी सांगितले.

Img 20240404 wa00142747383113629703933
Img 20240404 wa0013281293529802052601663206

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये