उद्या कोथरूडमध्ये शासन आपल्या दारी उपक्रम.. विविध शासकीय दाखले होणार उपलब्ध

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हर्षवर्धन मानकर यांच्या वतीने आयोजन
कोथरूड : राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड मतदार संघाच्या वतीने कोथरूड मधील नागरिकांसाठी उद्या १५ जुलै रोजी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत असून ‘योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी’ ! या ब्रीद वाक्याखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम राबवला जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमात शासकीय दाखले शासकीय दरात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हा उपक्रम सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सहज मिळावा यासाठी राबवण्यात येत असून सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन हर्षवर्धन मानकर यांनी केले आहे.
उद्या दि. १५ जुलै, २०२५ रोजी सकाळी ११:०० ते सायं. ५:०० या वेळेत गोकुळ सभागृह, बळवंतपुरम, शिवतर्थ नगर, पौड रोड, कोथरूड, या ठिकाणी हा उपक्रम राबवला जाणार आहे.

या उपक्रमा अंतर्गत उत्पन्नाचा दाखला, प्रतिज्ञापत्र / संमती पत्र, रहिवासी दाखला, वैद्यकीय सहाय्यता विभाग, स्मार्ट आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक, आधारकार्ड दुरुस्ती / नवीन, डोमासाईल, 30 टक्के महिला आरक्षण, रेशन कार्ड नाव कमी करणे/ वाढवणे, EWS सर्टिफिकेट, SEBC दाखला, नॉन-क्रिमिलेयर, जातीचा दाखला असे विविध प्रकारचे दाखले उपलब्ध करून दिले जाणार आहेत.









