वाहतूक नियमांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ; रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत कार्यक्रम

पुणे : शालेय जीवनातच वाहतूक नियमांची माहिती मुलांना झाली तर येणारी पिढी ही शिस्तबध्द वाहतूक प्रिय तयार होईल या हेतूनं रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत पर्वती दर्शन येथील राजीव गांधी अकॅडमी ई लर्निंग स्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनने विनायक ड्रायव्हिंग स्कूल सहकारनगर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजीव गांधी अकॅडमी ई लर्निंग स्कूलच्या नटसम्राट विजय तेंडुलकर सभागृह येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी मुलांना रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्त्व व वाहतुकीचे नियम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना वाहतुकीच्या नियमांचे माहिती पुस्तक या प्रसंगी वितरीत करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीची शपथ मोटर वाहन निरीक्षक विजय सावंत यांनी दिली.

सदर कार्यक्रमाला पुणे वरिष्ठ मोटर वाहन निरीक्षक विजय सावंत, मोटार निरीक्षक रहिमा मुल्ला, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्रद्धा कंदापुरे ,सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सतीश माळी, जयंत काटे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक रणजीत मगर, अरणेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रद्धा परांडे, श्वेता कुडले, मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजू घाटोळे. कार्याध्यक्ष विलास आपटे, सातारा रोड विभागाचे अध्यक्ष अनिल भिसे , पुणे शहर उपाध्यक्ष वीरेंद्र आंबेठी, टेक्निकल कमिटीचे विवेक माळवदे, सातारा रोड महिला विभाग अर्चना इरकल, राधा मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालिका रूपाली बोरकर, भिसे मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सुनील भिसे, काळे मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक किरण काळे, राधा मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक संतोष बोरकर, डॉक्टर ड्राईव्ह मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालक प्रतीक गवारे, अवधूत मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक अवधूत देवळे, आयुष मोटर ड्रायव्हिंग स्कूल धनकवडीचे संचालक विशाल बोबडे, स्वराज मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सचिन गुंड, भरत मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक भरत गायकवाड, संतोष कपटकर, बसंत कुमार भाटिया, लालू कदम, आदी मान्यवर उपस्थित होते












सदर प्रसंगी मोटर वाहन निरीक्षक रहिमा मुल्ला, विजय सावंत, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्रद्धा कंदापुरे , इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रद्धा परांडे व श्वेता कुडले यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन विनायक ड्रायव्हिंग स्कूल सहकार नगर पुणे 9 यांनी केले होते. कार्यक्रमासाठी विजय तेंडुलकर सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी माजी नगरसेवक आबा बागुल व अमित बागुल यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू घाटोळे यांनी केले. आभार प्रदर्शन वीरेंद्र मोटार ड्रायव्हिंग स्कूल पुणेचे वीरेंद्र आंबेटी यांनी केले.



