दर गुरुवारी पाणी बंद ठेवणार आहात तर बाकीचे दिवस पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन करा ; दिपाली धुमाळ यांची मागणी

पुणे : पुणे महानगरपालिका प्रशासनाने दि. 18 मे पासून पुणे शहारामध्ये दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुळात एक दिवस पाणी बंद ठेवले तरी पुढील तीन ते चार दिवस पाणी पुरवठा सुरळीत व्हायला वेळ जातो. आता दर गुरुवारी पाणी बंद राहणार असल्याने पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत गुरुवार येणार व परत पाणी बंद होणार त्यामुळे पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागणार असून पाण्यावाचून हाल होणार आहेत. हे हाल होऊ नयेत म्हणून महत्वाच्या उपाययोजना करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.
प्रभाग क्र 31 व 32 वारजे माळवाडी परिसरात ज्या वेळेस क्लोजर घेण्यात येतो तेव्हा पुढील चार दिवस पाणी पुरवठा बंद असतो किंवा कमी दाबाने पाणीपुरवठा होतो त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून मोठ्या प्रमाणात हाल होतात. हा
निर्णय घेतल्यानंतर नागरिकांचे पाण्यावाचून हाल होऊ नयेत या साठी
- 1 ) गांधीभवन टाकी ही गुरवारी पाणी पुरवठा बंद होण्यापूर्वी बुधवारी संपूर्ण पाणीपुरवठा झाल्यानंतर
कमीत कमी 80% भरणे गरजेचे आहे. तसेच बुधवारी रात्री कुंभारवाडी टाकी भरणे गरजेचे आहे. - 2 ) खडकवसला पंपिंग स्टेशन दरवेळेस रात्री 12 ते 1 किंवा 2 या वेळे प्रमाणे चालू होतो, त्या ऐवजी पंपिंग दर गुरुवारी रात्री 9 ते 10 या वेळे दरम्यान चालू झाला पाहिजे.
- 3)पंपिंग ची लाईट गेल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होतो, एम.एस.ई.बी चा एक फिडर बंद झाल्यास दुसऱ्या फिडर वरुन लाईन चालू ठेवण्याची व्यवस्था करावी. एम.एस.ई.बी यांच्याकडून सुधारणा व्हावी व जनरेटर मोठ्या प्रमाणाचा बसवावा.
- 4 ) एल अँड टी च्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी समन्वय ठेवावा.
- 5) ज्या भागात पाणी पुरेसे मिळत नाही त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा.
- 6) वारजे माळवाडी भागात पाणी पुरवठा मेंटेनेसची कामे कमी असल्याने शक्यतो क्लोजर रद्द करावा.
- 7) काही बैठ्या सोसायटी मध्ये चढावर असणाऱ्या घरांना पाणी मिळत नाही यासाठी वॉल सिस्टिम करावी.
प्रभाग 31 व 32 मध्ये दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यापूर्वी वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन नागरिकांचे पाण्यावाचून हाल होऊ नयेत त्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे दिपाली धुमाळ यांनी पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता यांचेकडे केली आहे.







