पुणे शहर

वारजे परिसरामध्ये जागतिक योग दिनाचे औचित्य साधून कायमस्वरुपी विनामूल्य योग वर्गाचे उद्घाटन.

विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

वारजे : योग विज्ञान संस्थान दिल्ली, शाखा पुणे व वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वारजे येथील राजमाता जिजाऊ योग साधना केंद्रमध्ये जागतिक योग दिनाचे औचित्य साधून कायमस्वरूपी विनामूल्य योग वर्गाचा शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ व मित्र परिवार यांनी केले होते. याप्रसंगी योग विद्नान संस्थान दिल्ली पुणे शाखेचे प्रमुख शिवप्रकाश मानधनी, दत्तात्रय रेड्डी, राजाभाऊ अभ्यंकर, दिलीप सोमवंशी, उदय हर्डीकर, श्रीधर डुरेपाटील, सुलेखा मानधनी व मीनाताई गावडे यांनी योगा संदर्भात मानवाच्या दैनदिन जीवनामध्ये किती महत्वाचे स्थान आहे याचे महत्व पटवून दिले.

योगामधील प्रत्येक आसने किती महत्वाचे आहे व या आसनामुळे काय काय फायदे होतात व कोणते रोग अथवा शरीराला अपायकारक असणाऱ्या गोष्टी कशा दुर करायचे यावर शास्त्रोक्त पध्दतीने योग साधकांना योगाद्वारे व प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून पटवून दिले . आजच्या या वर्गाच्या शुभारंभ प्रसंगी जवळपास दोनशे योग साधकांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष योग साधना केली.

सदर योगवर्ग रोज सकाळी साडे सहा ते आठ यावेळेत कायमस्वरूपी सुरू राहिल या योग वर्गात जास्तीतजास्त योग साधकांनी व नागरिकांनी सहभागी होऊन आपले शरीर तंदुरुस्त व निरोगी , आनंदी राहण्यासाठी रोज योगा करावा असे आवाहन दिपाली धुमाळ यांनी केले आहे. या योग वर्गात प्रशिक्षित योग शिक्षक योगाचे प्रशिक्षण देणार आहेत. हे योगावर्ग विनामूल्य आहे. या वर्गामध्ये योगसाधना चे वर्ग घेणारे है प्रशिक्षक है शास्त्रोक्त पध्दतीने उच्च शिक्षित व अनुभवी आहेत. या वर्गातून अनेक योग शिक्षक घडविण्याचे उद्दीष्ट असल्याचे बाबा धुमाळ यांनी सांगितले. सदर योग वर्ग यशस्वी होण्यासाठी महादेव गायकवाड, मानसी नलावडे व वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये