महाराष्ट्र

पंढरपूरच्या वारीचा जागतिक सांस्कृतिक सोहळा यादीत समावेश होणार..

पुणे : प्रत्येक वारकऱ्याला आनंद वाटेल अशी बातमी पंढरपूरच्या वारीचा जागतिक अमुर्त्य सांस्कृतिक सोहळा यादी मध्ये समावेश होण्याच्या दिशेने एक पाऊल पडले आहे.

युनेस्कोच्या जागतिक अमुर्त्य सांस्कृतिक सोहळा यादीमध्ये पंढरपूर वारीचा समावेश करण्यात यावा यासाठी पुण्याच्या सिद्धेश्वर अर्जुन गिरमे या तरुणाने केंद्र सरकारला पत्र लिहून विनंती केली होती. सरकारने याबाबत सिध्देश्वरला सकारात्मक उत्तर पाठवले आहे.

सरकारने  सिध्देश्वरला पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे की, सरकारने हा प्रस्ताव पुढे समितीकडे पाठवला असून यावर लवकरच निकाल दिला जाईल. या पत्रामुळे आपल्या आशा पल्लवित झाल्या असून सरकारने प्रतिसाद दिल्याबद्दल सिध्देश्वरने आभार मानले आहेत.

Img 20220705 wa0144

युनेस्कोच्या जागतिक सांस्कृतिक सोहळा यादी मध्ये वारीचा समावेश झाला तर भारताकडून अजून एका सोहळ्याचा या यादी मध्ये समावेश होईल. या यादीमध्ये पूर्वीच कुंभमेळा, बंगलाची दुर्गा पूजा या सोहळ्याचा समावेश झाला आहे. या निमित्ताने वारीचा समावेश झाला तर महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला अभिमान वाटणार आहे. सध्या पंढरपूरचा वारी सोहळा सुरू आहे. हा सोहळा सुरू असतानाच सरकारकडून प्रतिसाद मिळाल्याने विठ्ठल भक्तांसाठी ही आनंदाची बाब असल्याचे सिध्देश्वरने म्हंटले आहे.

Img 20220705 wa0145
Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये