पुणे शहर

सामाजिक दायित्व पार पाडण्यासाठी किरण दगडे पाटील कायम तत्पर : चंद्रशेखर बावनकुळे

किरण दगडे पाटील २५ हजार नागरिकांना अयोध्येतील श्रीराम मंदिराचे दर्शन घडवणार

कोथरुड : सातत्याने सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक दायित्व पार पाडण्याचे काम किरण दगडे पाटील करत असतात. काहींना केवळ निवडणूक आली की मतदारांची आठवण येते पण ते निवडणूक असू नसू आपल्या मतदारांसाठी काही ना काही स्तुत्य उपक्रम सातत्याने राबवत असतात असे गौरोद्गार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले.

माजी नगरसेवक किरण दगडे पाटील व माजी सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांच्या वतीने घेण्यात आलेल्या
प्रभाग १० भुसारी कॉलनी, बावधन मधील ६ हजाराहून अधिक नागरिकांना दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. या प्रसंगी आमदार भिमराव तापकीर, भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, राजेश पांडे, संदीप खर्डेकर, माजी नगरसेविका अल्पना वरपे, श्रध्दा प्रभुणे,भाजप पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव नाना काळे , युवा मोर्चा जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी त तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून किरण दगडे पाटील सामाजिक दायित्वाची भूमिका बजावत आहेत. प्रत्येक स्तरातील लोकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना आणल्या आहे. सर्वसामान्य जनतेचे जीवन आनंदी कसे होईल याचाच प्रयत्न मोदी सरकारचा राहिला आहे.

पाच हजार नाही तर पंचवीस हजार नागरिकांना अयोध्येतील श्रीरामाचे दर्शन

२२ जानेवारी रोजी भारत वासीयांच्या स्वप्नातील अयोध्येतील श्री राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. विरोधकांनी किती टीका केली तरी राम मंदिर आपण उभा करून दाखवले आहे. किरण दगडे पाटील यांनी हजारो नागरिकांना काशी विश्वनाथ यात्रा घडवली आहे. त्या प्रमाणे त्यांनी पाच हजार नागरिकांना श्री राम मंदिर दर्शन यात्रा घडवावी. यावर किरण दगडे पाटील यांनी पाच हजार नाही तर पंचवीस हजार नागरिकांना आपण श्री राम मंदिर दर्शन यात्रा घडवणार आहे असा शब्द दिला आणि उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाट केला. या घोषणेनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी किरण दगडे पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

दिवाळी सरंजाम उपक्रम गेली नऊ वर्ष सातत्याने राबवत असताना नागरिकांना दिलेला शब्द पाळत असल्याने मनाला एक समाधान मिळते. प्रभागातील प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी हाच या मागचा हेतू असून त्यामुळेच कोणताही खंड न पाडता हा उपक्रम राबवत आल्याचे माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी सांगितले.

Img 20230717 wa0012281292712276676815194924
Img 20231108 wa00237827862688283707789
Img 20230511 wa0002282296555721650380460122
Digital 20231109 072816 00003816822864625956881

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये