पुणे शहर

कोविड 19 : महाराष्ट्राच्या तुलनेत पुण्याचा पॉझिटिव्हिटी दर दुप्पट

पुणे : कोविडचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 49.9 टक्के असल्याचं समोर आलं आहे. हा दर गेल्या आठवड्यात नोंदवलेल्या राज्याच्या सरासरी 24 टक्क्यांच्या दुप्पट आहे. त्यामुळे पुणेकरांनी नियमांचं पालन करून आपली काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

सरकारकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, 17 ते 24 जानेवारी दरम्यान झालेल्या RT-PCR चाचणीद्वारे एकूण 84,902 लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. इतकंच नाहीतर रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) तसेच RT-PCR साठी एकूण 2.22 लाख नमुने तपासण्यात आले. ज्यामध्ये 97,838 लोक पॉझिटिव्ह आढळले.

ओमिक्रॉनमुळेच हे घडत असून, येत्या दहा दिवसांपर्यंत हीच परिस्थिती राहू शकते, असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या काळात लोकांनी खूप काळजी घ्यावी आणि घरातच राहावे. 10 ते 15 दिवसांनी केसेस कमी होण्यास सुरुवात होईल, अशी आमची अपेक्षा आहे असे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले आहेत.

Img 20220123 wa0404

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये