शैक्षणिक

दहावीचा निकाल आज


पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल 17 जून 2022 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता निकाल ऑनलाइन जाहीर होणार आहे.


दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले आहेत.

‘या’ वेबसाइटवर बघू शकता निकाल

mahresult.nic.in

sscresult.mkcl.org

mkcl.org

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये