आंतरराष्ट्रीयसांस्कृतिक

दुबईमध्ये महाराष्ट्र दिन दणक्यात साजरा

१ मे आणि कामगार दिन हा महाराष्ट्रात सगळीकडे साजरा केला जातो. याचा प्रत्यय साता समुद्रापार दुबईमध्ये सुद्धा दिसून आला. दुबई मधील संस्कृती मराठी मंडळाने देखील रविवार सुट्टी असल्याने ३० एप्रिल रोजी महाराष्ट्र दिन आणि  कामगार दिन  दणक्यात साजरा केला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती सावंत, सद्गुरू फाऊंडेशनचे महेश कुमठेकर, सुशांत चिल्लाळ आणि माधुरी बोंद्रे – रहाळकर यांनी हजेरी लावली त्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.  मंडळ २०२१ ला चालु झाल्यापासून आत्तापर्यंत केलेल्या कार्यक्रमांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रम करताना मंडळातील अनु कच्छाव, ईला, विकास, स्नेहल जाधव आणि सहकारी आणि दुबईमधील महिलांचे साई लेझिम पथक यांनी आपापली कला सादर केली.
सुशांत चिल्लाळ यांनी सर्वांना महाराष्ट्रावर आधारित प्रश्नमंजुषा केली आणि ज्याचे उत्तर बरोबर असेल त्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना यादव, मनोज बागल,मंदार कुलकर्णी यांनी केले तसेच आभारप्रदर्शन रेखा सूर्यवंशी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर मुंढे आणि मंडळातील सर्व सभासदांचा खुप मोठा हातभार लागला.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये