राज्याचे अनलॉक ४.० नियमावली जाहीर

मुंबई : राज्य सरकारने आज अनलॉक ४.० ची नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार राज्यसरकारने ई पास रद्द केला असून राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी आता परवानगी लागणार नाही. केंद्र सरकारने अनलॉक ४ ची दोन दिवसांपूर्वी घोषणा केल्यानंतर आज राज्यसरकारने आपली गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यामध्ये हॉटेल आणि लॉज शंभर टक्के करण्यास परवानगी देण्यात आली आहे असे म्हंटले असले तरी रेस्टॉरंट (उपहारगृह) की हॉटेल याबाबत प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्य सरकार च्या नव्या नियमावलीनुसार कंटेनमेंट झोनमध्ये ३० सप्टेंबर पर्यंत लॉक डाउन सुरूच राहणार आहे. स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी पालिका आयुक्त कंटेनमेंट बाबत निर्णय घेऊ शकणार आहेत.
शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, क्लासेस, सिनेमा हॉल, पार्क स्विमिंग पूल, थिएटर, मेट्रो सेवा, सामाजिक, राजकीय मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम बंदच राहणार आहेत. सरकारी कार्यालये त्यांना दिलेल्या क्षमतेनुसार सुरू ठेवायचे आहेत खासगी कार्यालयांमध्ये 30 टक्के कर्मचारी उपस्थितीला परवानगी आहे.
इतर दुकाने, दारूची दुकाने सुरू राहणार आहेत खाजगी बस, मिनीबस, आदींचे वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे



