सिनेजगत

नितीन देसाईंच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूडकरांची पाठ; आमिर खानसह जुन्या मैत्रीला जागले हे कलाकार

मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूडकरांनी पूर्णपणे पाठ फिरवली. यावेळी भक्त आमिर खानने आपली मैत्री दाखवली. शेकडो बॉलिवूडकरांमधून नितीन यांच्या अंत्यदर्शनाला केवळ ७ लोक आले.

देसाई यांनी २ ऑगस्टला पहाटे ४.३० वाजता आत्महत्या केली. देसाई त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण आर्थिक चणचण असल्याचे सांगण्यात आले. आता दोन दिवसांनी नितीन देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी बॉलिवूडमधून मोजून ६ ते ७ कलाकाराच नितीन चंद्रकांत देसाई यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते. यावेळी अभिनेता आमिर खान अंत्यदर्शनासाठी पोहोचला. नितीन यांच्या अंत्यदर्शनावेळी सर्वांचेच डोळे पाणावलेले होते. आमिर खान व आशुतोष गोवारीकर यांनी नितीनची पत्नी आणि मुलांची भेट घेतली. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार व दिग्दर्शक मधुर भांडारकरही आले. संजय लीला भन्साळी, अभिनेते मनोज जोशी, मुकेश ऋषी देखील आले होते.

नितीन देसाई यांनी ज्या प्रसिद्ध चित्रपटांचे सेट डिझाइन केले होते त्यात ‘प्यार तो होना ही था’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘मिशन कश्मीर’, ‘राजू चाचा’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘बाजीराव मस्तानी’ यांचा समावेश आहे. नितीन देसाई यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर २००५ मध्ये ५२ एकरमध्ये एनडी स्टुडिओची स्थापना केली होती. नितीन यांच्या पश्चात पत्नी नयना आणि मुलगी मानसी आहे. यासोबतच त्यांना एक मुलगाही आहे, त्याचे नाव सिद्धार्थ आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये