कोथरुड

श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे कोथरूडमध्ये स्वागत, दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पुणे : कोथरूड येथील आनंदनगर पार्क सोसायटी येथे  श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अक्कलकोट समाधी मठ येथील मुख्य पादुकांचे आगमन व दर्शन सोहळा मोठया उत्साहात पार पडला. यावेळी कोथरूड मधील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

पल्लवी गाडगीळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गाडगीळ म्हणाल्या,  स्वामींच्या पादुकांचे आगमन हे आमच्यासाठी खरोखर एक सुखद घटना आहे. या निमित्ताने दर्शनासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे तंत्र व उच्च शिक्षण संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित राहिले.त्यांच्या हस्ते स्वामींच्या पादुकांचे अभिषेक व पूजन करण्यात आले.

त्यावेळी  राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच इतर क्षेत्रातील नामांकित मान्यवरही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले व माझ्या प्रभागातील व पुणे शहरातील 2000 हून अधिक स्वामी भक्तांनी  दर्शनाचा लाभ घेतला हे पाहून आज आमच्याकडून स्वामींची जी काही छोटीशी सेवा घडली त्यातून एक वेगळेच समाधान मनाला मिळत आहे. असे गाडगीळ म्हणाल्या.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682
Fb img 16837376233493064729888638918603

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये