पुणे शहर
वस्ती भागात लसीकरणासाठी अधिक लक्ष द्यावे- आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : कोविड प्रतिबंधक लस घेण्यास वस्ती भागात वेग आलेला नाही . याकरिता या भागावर प्रशासनाने अधिक लक्ष द्यावे, अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.
कोविड प्रतिबंधक उपाययोजना आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी आज शुक्रवारी बैठक घेण्यात आली. त्यात बोलताना आमदार शिरोळे यांनी वस्ती भागात लसीकरण व्हावे असा आग्रह धरला. वस्ती भागात कोविड नियमावलींचे पालन होत नाही, याकरिता नागरिकांचे प्रबोधन व्हावे, असे आ. शिरोळे यांनी बैठकीत सांगितले.लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी सोमवारपासून महाविद्यालये सुरू होतील, असेही आमदार शिरोळे यांनी सांगितले.










