कोथरुड

कोथरुडमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त “जागर आरोग्याचा ” उपक्रमाचे आयोजन..

कोथरुड : pune city, Kothrud श्री तुळजाभवानी माता व राधाकृष्ण सेवा संस्था कोथरूड गाव यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त “उत्सव नवरात्रीचा,जागर आरोग्याचा” या आरोग्यदायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नवरात्रीचे सर्व दिवस विविध मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज कोथरुड येथे डॉ. सतीश देसाई, नरेश राठी, गोपाल राठी, प्रमोद देशमुख, रवी चौधरी, सुरेश शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
             

लायन्स क्लब ॲाफ पुणे शनिवारवाडा, सुबुध हॅास्पीटल, शेठ ताराचंद हॉस्पीटल, डॉ.सुजय लोढा, डॉ. जेनीफर कोलते, डॉ.रवी किरण शहा, डॉ . शेखर घाटपांडे यांच्या सहकार्याने हे आरोग्य शिबीर राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत  दिनांक ७ ऑक्टोबर रोजी नेत्रचिकीत्सा मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रीया व चष्मेवाटप शिबीर, ८ रोजी कान नाक घसा तपासणी व मोफत औषधोपचार, ९ रोजी हाडांची तपासणी व औषधोपचार, १० रोजी हिमोग्लोबीन तपासणी व औषधोपचार, ११ रोजी त्वचारोग तपासणी व औषधोपचार, १२ रोजी डायबेटीस, बीपी व दंतचिकीत्सा शिबीर, १३ रोजी महिलांसाठी स्त्रीरोग तपासणी व ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबीर,१४ रोजी जनरल चेकअप व लहान मुलांसाठी आयुर्वेदीक औषधवाटप शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
         

Img 20211005 wa0014

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गेली २ वर्ष नवरात्र उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होत आहे म्हणुन संस्थेच्या वतीने यंदा आरोग्याचा जागर म्हणुन हा उत्सव साजरा करीत असल्याचे आयोजक ॲड योगेश मोकाटे यांनी सांगितले.तसेच जास्तीत जास्त गरजुंनी या विनामुल्य आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहनही मोकाटे यांनी केले.

आजच्या कार्यक्रमात शेठ ताराचंद हॉस्पीटलचे डॉक्टर भाग्यश्री नागापुरकर, डॉ गायत्री कामत, प्रगती जाधव किरण कड यांनी नेत्रतपासणी शिबीर पार पाडले.यावेळी संस्थेचे पदाधिकारी छाया भोसले, प्रज्ञा लोणकर, भारती भोपळे, विरेंद्र ठाकुर, निखील गायकवाड, सोमनाथ जाधव, श्रीनिवास भांबुरे, जालींदर सातव, युवराज सुपेकर, सोमनाथ सातव, दिलीप जानोरकर, पद्माकर नेर्लेकर, सुहास अत्रे, लायन्सचे सुहास बल्लाळ, प्रदीप बर्गे, प्रतिभा शेठ, स्मिता बल्लाळ आदी उपस्थित होते.

Screenshot 2021 10 09 09 47 24 86

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये