कोरोनाचा उद्रेक पुणे शहरात एकाच दिवसांत उच्चांकी कोरोनाबाधित रुग्ण आढळले.

बुधवारी दिवसभरात नवे ४ हजार ४५८ कोरोनाबाधित
पुणे : पुणे शहरात आज नव्याने ४ हजार ४५८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ६९ हजार ३४३ इतकी झाली आहे.Outbreak of corona was reported in Pune city in a single day.
दिवसभरात ३ हजार ३७४ रुग्णांना डिस्चार्ज
शहरातील ३ हजार ३७४ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख ३० हजार १८३ झाली आहे.
दिवसभरात १६ हजार ४४६ टेस्ट
पुणे शहरात आज एकाच दिवसात १६ हजार ४४६ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता १४ लाख ७९ हजार ०३३ इतकी झाली आहे.
गंभीर कोरोनाबाधितांची संख्या ७९९
पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ३३ हजार ८५८ रुग्णांपैकी ७९९ रुग्ण गंभीर तर ३,३७४ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
नव्याने ३२ मृत्युंची नोंद
पुणे महापालिका हद्दीत नव्याने ३२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ५ हजार ३०२ इतकी झाली आहे.पुणे शहरातील २८ हजार ०४७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून ५ हजार ८११ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ! एकूण कोरोनाबाधित ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ३३ हजार ८५८ इतकी आहे.




