पुणे शहर

महाराष्ट्रातील महिला अत्याचारांविरोधात भाजपाचे ‘आक्रोश आंदोलन’

पुणे : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निष्क्रिय महाविकास आघाडी सरकार विरोधात महिला मोर्चा कोथरूड मतदारसंघातर्फे आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी महाराष्ट्र सरकार विरुद्ध आपला निषेध व्यक्त केला. जर खुर्चीच्या मोहात अडकलेल्या आंधळ्या,बहिऱ्या उध्दव सरकारने लवकरात लवकर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध कार्यवाही केली नाही तर आम्ही लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरू असे आवाहन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले.

Img 20201012 wa0007

या आंदोलनाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पश्चिम महाराष्ट्र संघटक प्रमुख रविजी अनासपुरे, प्रदेशाच्या सचिव वर्षा डहाळे,नगरसेविका हर्षाली माथवड ,वासंती जाधव,मंजुश्री खर्डेकर,कांचन कुंबरे, दुष्यंत मोहोळ,दिनेश माथवड,नवनाथ जाधव, सचिन मोकाटे, शिरीष भुजबळ,कोथरुड मतदार संघातील सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष पुनीत जोशी व महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्या नेतृत्वात आजचे जन आक्रोश आंदोलन पार पडले.

7 6

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये