कोथरुड

प्रभाग १३ मधील स्वच्छता सेवकांसाठी माझा भाग – स्वच्छ भाग स्पर्धेचे आयोजन

क्रिएटिव्ह फौंडेशन आणि प्रसन्न पर्पल चा उपक्रम

कोथरूड : पुणे महापालिकेच्या रस्ते व परिसर स्वच्छ करणारे सेवक, घरोघरी कचरा वेचणारे स्वच्छचे स्वच्छता सेवक व झाडांच्या फांद्या झावळ्या, कचरा गोळा करणारे उद्यान विभागाचे कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी  प्रभाग १३ एरंडवणा- हॅप्पी कॉलनी मध्ये माझा भाग स्वच्छ भाग अशा स्पर्धेचे आयोजन क्रिएटिव्ह फौंडेशन आणि प्रसन्न पर्पल च्या वतीने करण्यात आले आहे.

दिनांक १ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान परीक्षकांमार्फत या स्पर्धेसाठी परिसराची पाहणी केली जाणार आहे. प्रभागातील प्रत्येक भागाच्या स्वच्छतेचा आलेख तयार करुन त्याप्रमाणे गुण देण्यात येतील व त्या पाहणीनुसार प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ अशी बक्षीसे विविध गटात दिली जाणार आहेत .नागरिकांचा अभिप्राय देखील विचारात घेतला जाणार आहे.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 00 pm

कालांतराने अशी स्पर्धा शहर पातळीवर घेण्याचा देखील मानस असून इंदूर च्या धर्तीवर पुणे ही देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहर ठरावे या भावनेने ही स्पर्धा आयोजित केली जात आहे असे क्रिएटिव्ह फौंडेशनचे संदीप खर्डेकर आणि प्रसन्न पर्पल चे प्रसन्न पटवर्धन यांनी जाहीर केले आहे.

या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक – घड्याळ, द्वितीय क्रमांक – मोबाईल, तृतीय क्रमांक – प्रवासी बॅग तसेच महिला सेविकांना प्रथम क्रमांक एक ग्रॅम सोन्याचा हार, द्वितीय क्रमांक पैठणी  व तृतीय क्रमांक सोन्याची नथ अशी भरघोस बक्षीसे देण्यात येणार आहेत.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

या स्पर्धेसाठी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर
वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संतोष वारुळे यांचे विशेष सहकार्य मिळणार आहे.  
ही स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात प्रभागातील सर्व पाच आरोग्य कोठी अंतर्गत घेण्यात येत आहे.

Img 20201118 wa0057

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये