कोथरूडमध्ये सिंधुदुर्ग येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाचे निषेध आंदोलन
या घटनेने भ्रष्टाचाराचा चेहरा उघडा पडला : स्वप्नील दुधाने
कोथरूड : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या वतीने बाणेरमध्ये असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला नमन करत सिंधुदुर्ग या ठिकाणी घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी राज्य शसानाविरोधत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शिवरायांचा अपमान, महाराष्ट्राचा अपमान.. , राज्यात ना शिवकन्या सुरक्षित, ना शिवस्मारक.., शिवस्मारकाच्या घडलेल्या अनर्थाचा हिशोब सरकारला द्यावा लागेल, शिव स्मारकाच्या अपमानाविरुध्द महाराष्ट्र उठला आहे, मोदींची प्रसिद्धीची हाव अन महाराष्ट्राच्या दैवतावर घाव असे फलक घेऊन कार्यकर्ते, पदाधिकारी निषेध आंदोलनात सहभागी झाले होते.
कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष सप्नील दुधाने यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन घेण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे, युवक अध्यक्ष गिरीश गुरूनानी, महिला अध्यक्ष ज्योती सूर्यवंशी, युवती उपाध्यक्ष रोशनी साबळे, महेश कन्हेरकर, मनीषा भोसले, मीनल सुर्वे, किशोर शेडगे, सूरज शिंदे, सचिन यादव, अमित भगत, महेश शिवचरण व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासोबत घडलेली घटना अत्यंत क्लेशदायक आणि चीड आणणारी होती. या ठिकाणी पुतळ्याच्या माध्यमातून भ्रष्ट राजकारणाचे पितळ उघडे पडले असून या प्रकरणात सहभागी सर्वांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी पक्षाच्या वतीने स्वप्नील दुधाने यांनी केली.
शिवरायांचा अपमान हा स्वाभिमानी महाराष्ट्र कदापी सहन करणार नसून भविष्यात यावर लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास जनआंदोलन उभारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. येत्या निवडणुकीत महाराष्ट्राला लागलेली ही भ्रष्टाचाराची वाळवी साफ करून पुनःश्च छत्रपती शिवरायांची पावन भूमी ही ओळख मिळवून देण्यासाठी नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन यावेळी पक्षाच्या वतीने करण्यात आले