२६/११ मधील शहिदांना रक्तदान शिबिरातून श्रद्धांजली ; सलग १४ वर्षे उमेश भेलके यांच्याकडून शिबिराचे आयोजन..

कोथरुड : शिवसेना कोथरुड विभागाच्या वतीने
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वीर पोलीस अधिकारी, सैनिक व नागरीक यांना रक्तदान शिबिर घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. या शिबिरात १८५ जणांनी रक्तदान केले.
सलग १४ वर्षे शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन शिवसेना विभाग संघटक उमेश भेलके व अक्षदा उमेश भेलके यांच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी मेणबत्त्या लावून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी शिवसेना पुणे शहर सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरेडकर, माजी नगरसेवक योगेश मोकाटे, शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, संतोष खाडे, अजय भुवड, जयदिप पडवळ, राम थरकुडे, गणेश काकडे, भारती भोपळे, विशाल भेलके, धनेश हगवणे, सागर भेलके, गोविदं थरकुडे, सचिन धनकुडे, आनिल बोराटे, चेतन भालेकर आदी उपस्थित होते.

उमेश भेलके म्हणाले, गेली १४ वर्षे आम्ही शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हे रक्तदान शिबिर घेत आहोत. या शिबिरात दरवर्षी न चुकता शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काही तरुण रक्तदान करण्यासाठी येत असतात तर काही नव्याने समविष्ट होत असतात. या शिबिरात रक्तदान करून खऱ्या अर्थाने देशासाठी, सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी आपण काहीतरी केले अशा भावना रक्तदाते व्यक्त करत असतात.
पूना ब्लड बँक च्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले. शिवसेना कोथरुड विभाग, स्व,उत्तमकाका भेलके प्रतिष्ठान, संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळ, एकदंत वाद्य पथक, समर्पण युथ फोरम यांनी शिबिराचे संयोजन केले.






