२६/११ मधील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सलग १५ वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन ; उमेश भेलके यांचा उपक्रम
कोथरुड : शिवसेना कोथरुड विभागाच्या वतीने
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वीर पोलीस अधिकारी, सैनिक व नागरीक यांना रक्तदान शिबिर घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. या शिबिरात २३२ जणांनी रक्तदान केले.
सलग १५ व्या वर्षी शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन शिवसेना कोथरूड विभाग संघटक उमेश भेलके यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी मेणबत्त्या लावून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी माजी नगरसेवक पृथ्विराज सुतार, योगेश मोकाटे, राजाभाऊ गोरडे, साहेबराव भेलके, आनिल गोरे, आप्पा पोफळे, दादा भेलके, बाळासाहेब खैरे, आनंद घैसास, गोविंद थरकुडे, विजय डाकले, राम बोरकर, विशाल भेलके, चेतन भालेकर, संदीप मोकाटे, जयदिप पडवळ, वैभव दिघे, आनिरुध्द खांडेकर, मंगेश खराटे, राम थरकुडे, अजय भुवड, विनोद मोहीते, सचिन विप्र , प्रितम मेहता, धनेश हगवणे, बाळासाहेब गायकवाड, वंसत वाघ, किरण उभे, आक्षदा भेलके, सुरेखा होले, भारती भोपळे, प्रज्ञा लोणकर, रुपाली मेहता, नंदिनी भेलके या उपस्थित होत्या.
उमेश भेलके म्हणाले, गेली १५ वर्षे आम्ही शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हे रक्तदान शिबिर घेत आहोत. या शिबिरात दरवर्षी न चुकता शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काही तरुण रक्तदान करण्यासाठी येत असतात तर काही नव्याने समाविष्ट होत असतात. या वर्षी महिलांनीही रक्तदान करत या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे आणि ही उल्लेखनीय बाब आहे. या शिबिरात रक्तदान करून खऱ्या अर्थाने देशासाठी, सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी आपण काहीतरी केले अशा भावना रक्तदाते व्यक्त करत असतात.
पूना ब्लड बँक च्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले. शिवसेना कोथरुड विभाग, स्व,उत्तमकाका भेलके प्रतिष्ठान, संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळ, एकदंत वाद्य पथक यांनी शिबिराचे संयोजन केले.