कोथरूड मध्ये महिला काँग्रेसचा हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न

आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिल्या महिलांना शुभेच्छा !
कोथरूड : कोथरूड महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हळदी कुंकू समारंभ उत्साही वातावरणात पार पडला. शेकडो महिलांनी समारंभात सहभागी होत संक्रांतीचे वाण लुटले.
कोथरूड महिला कॉंग्रेसच्या मानसी राज जाधव व सविता ओंकार धुत यांच्या वतीने या “हळदी कुंकू समारंभाचे आयोजन कोथरूड मधील वांजळे सभागृहात करण्यात आले होते.
यावेळी समारंभास उपस्थिती राहत आमदार रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले हळदी कुंकू समारंभ हा हिंदू संस्कृतीचे जपणूक करणारा समारंभ आहे. या समारंभाच्या माध्यमातून महिला एकत्र येतात, हळदी कुंकू करतात, वाण लुटतात त्यामुळे त्यांची एकमेकिंशी ओळख होते आणि स्नेह वाढतो. माणूस च माणसाच्या मदतीला धावून येतो. या झालेल्या ओळखीतून महिला एकमेकींना अडचणीत मदत करून पुढे जाऊ शकतात. तुम्हाला काही अडचण जाणवली, समस्या जाणवली तर आवाज द्या मी नक्की तुमच्या अडचणी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल.

यावेळी माजी आमदार, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश महिला कॉंग्रेस सरचिटणीस स्वाती शिंदे, पुणे महिला कॉंग्रेस शहराध्यक्षा पुजा मनिष आनंद, शहर उपाध्यक्षा प्राची दुधाने, शहर सरचिटणीस नयना सोनार, कोथरूड महिला सरचिटणीस सुरेखा मारणे, अभया विचारे, विद्या लव्हार्डे, संगीता चोरगे, कार्यक्रमाचे संयोजक विद्यार्थी कॉंग्रेस कोथरूड विधानसभा अध्यक्ष राज जाधव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विशेष व्यवस्थापन सारीका गाढवे, मोहीणी आहेर, सायली गाढवे, सोनाली मोकाटे, डॉ.वैशाली बोरसे, रत्ना सायबाने, संध्या भराडीया, भंडारी, राखी सारडा, हर्षा शेट्टी, राणी चिंतामणी यांनी केले.





