पुणे शहर

आपलं पुणे लसीकरणात राज्यात अव्वल – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : कोरोना लसीकरण सुरु झाल्यापासून तर आजतागायत लसीकरण नियोजनाच्या बाबतीत पुण्याने घेतलेली आघाडी आणि राबवलेल्या विविध विशेष मोहिमा, यामुळे आपली पुणे महानगरपालिका लसीकरणाच्या बाबतीत राज्यात अव्वल आहे. या कामगिरीबद्दल राज्य सरकार आपला विशेष सन्मानदेखील करणार आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

मोहोळ म्हणाले, लसीकरणाचे उत्तम पद्धतीने केलेले नियोजन, आरोग्य यंत्रणेचे राबलेले सर्व घटक आणि विशेष म्हणजे पुणेकरांनी लसीकरणाला दिलेला उत्तम प्रतिसाद, यामुळे हे यश आपल्या वाट्याला आले आहे. आगामी काळातही आपण वेगाने आणि उत्तम परफॉर्मन्ससह लसीकरण मोहीम कायम ठेवणार आहोत.

Screenshot 2021 10 09 09 47 24 86

लसीकरण सद्यस्थिती
(७ ऑक्टोबरपर्यंत)

◆ एकूण लसीकरण : ४७ लाख २० हजार ५९१
◆ पहिला डोस : ३० लाख ८५ हजार ५१५
◆ दुसरा डोस : १६ लाख ३५ हजार ०७६
◆ स्पेशल ड्राईव्ह : २ लाख ८४ हजार १९८

Img 20211005 wa0014

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये