पुणे शहर
पुण्यात बागेश्वर महाराजांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी
पुणे : पुण्यातील संगमवाडी येथे सुरू असलेल्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज यांच्या कार्यक्रमाला विविध संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. शिवाजीनगर येथील संचेती हॉस्पिटल चौकात बागेश्वर महाराजांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या आहेत.
भीम आर्मी व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पुणे पोलिसांना या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी विनंती करण्यात आली होती. त्यानंतरही या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आल्याने विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत बागेश्वर महाराजांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.