ह.भ.प. माणिक दुधाने पुरस्कृत “दिनदर्शिकेचे चित्तरंजन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन..

वारजे : सर्व शाखीय ब्राह्मण महासंघ कर्वेनगरच्या ह.भ.प. माणिक दुधाने पुरस्कृत “दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे वारजे कर्वेनगर संघचालक चित्तरंजन भागवत यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला सर्व शाखीय ब्राम्हण महासंघाच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती.
यावेळी प्रवीण दुधाने, तेजल दुधाने, मयूर दुधाने उपस्थित होते. माणिक दुधाने यांनी खास ब्राह्मण समाजासाठी येणाऱ्या काळामध्ये पाच एकर जागेमध्ये कार्यक्रमांसाठी मोठे सभागृह बांधून देण्याचे आश्वासन या प्रसंगी दिले. यावेळी माणिक दुधाने परिवाराकडून वारजे कर्वेनगर परिसरात करण्यात येत असलेल्या कामाचे कौतुक उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आले.
यावेळी जेष्ठ शिक्षणतज्ञ अ.ल. देशमुख, लिज्जत पापड उद्योग समुह सी.ई.ओ. सुरेश कोते, देसाई बंधू आंबेवाले उद्योजक मंदार देसाई , ॲड. दिपक मैड, अशोक जोशी, प्रमोद जोशी,बाळासाहेब बराटे, निखिल शिवले, योगेश सुपेकर, नाना शिंदे ,जे.डी अमारे, संजय वाल्हेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा जोशी मराठे यांनी केले.







