कोरोना लसीकरणासाठी पुणे महापालिका सज्ज !

पुणे : कोरोना विषाणूची शहरातील सद्यस्थिती आणि कोरोना लस डिसेंबर अखेरपर्यंत येण्याचे केंद्र सरकारचे संकेत, याबाबतीत पुणे महानगरपालिकेच्या वतीने लसीच्या साठवणुकीसाठी आणि वितरणाची करण्यात येणारी तयारी याविषयी आढावा घेण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी, गटनेते व अधिकारी यांची महापौर कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी कोरोना संसर्ग निर्मूलन, व्यवस्थापन आणि लसीकरण याबाबत सविस्तर चर्चा केली असून लसीकरणासाठी आपली पुणे महानगरपालिका सज्ज आहे. अशी माहिती मोहोळ यांनी दिली आहे.
याप्रसंगी आमदार सौ. मुक्ताताई टिळक, उपमहापौर सौ. सरस्वतीताई शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष श्री हेमंत रासने, सभागृह नेते श्री धीरज घाटे, विरोधी पक्षनेत्या सौ. दिपालीताई धुमाळ, कॉंग्रेस गटनेते श्री आबा बागूल, शिवसेना गटनेते श्री पृथ्वीराज सुतार, मनसे गटनेते श्री वसंत मोरे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल तसेच इतर मान्यवर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
#PuneFightsCorona #PMCFightsCorona #Covid_19 #Vaccine






















