आता ग्रामीण भागात रणसंग्राम ; ग्रामपंचायत निवडणुकांनी वातावरण तापणार

मुंबई : महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्याने आता ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापणार आहे. १५ जानेवारी रोजी राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.
या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी केली. नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली आहे.. आता ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पुन्हा भाजपा व महाविकास आघाडी असा सामना रंगणार असल्याचे दिसत आहे.

३१ मार्च रोजी एप्रिल, जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होणार होते. परंतु कोरोनाचे संकट आल्याने या निवडणुका रद्द करण्यात आल्या होत्या. आता मागील व डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.






जिल्हानिहाय निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या
पुणे- ७४८, सोलापूर- ६५८, सातारा- ८७९, सांगली- १५२, कोल्हापूर- ४३३, औरंगाबाद- ६१८, बीड- १२९, नांदेड- १०१५, उस्मानाबाद- ४२८, परभणी- ५६६, जालना- ४७५, लातूर- ४०८, ठाणे- १५८, पालघर- ३, रायगड- ८८, रत्नागिरी- ४७९, सिंधुदुर्ग- ७०, नाशिक- ६२१, धुळे- २१८, जळगाव- ७८३, अहमदनगर- ७६७, नागपूर- १३०, वर्धा- ५०, चंद्रपूर- ६२९, भंडारा- १४८, गोंदिया- १८९ आणि गडचिरोली- ३६२. एकूण- १४२३४. , नंदुरबार- ८७, हिंगोली- ४९५, अमरावती- ५५३, अकोला- २२५, यवतमाळ- ९८०, वाशीम- १६३, बुलडाणा- ५२७,












