पुणे शहर

विद्यार्थ्यांनी रंगांमधून दिली कल्पनाशक्ती आणि विचारांना दिशा..

कर्वेनगरमधील चित्रकला स्पर्धेत मुले झाली दंग..मंत्री चंद्रकांत पाटील यांची आयोजकांवर कौतुकाची थाप

कर्वेनगर : कर्वेनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी रंगांमधून आपली कल्पनाशक्ती आणि विचार प्रभावीपणे व्यक्त करत स्पर्धेला रंगत आणली. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

भाजप पुणे शहर चिटणीस महेश पवळे यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन कर्वेनगर मधील काकडे पॅलेस मध्ये करण्यात आले होते. ८०० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत चित्रांच्या माध्यमातून आपल्यातील कल्पना शक्तीला दिशा दिली.

Img 20250508 wa0001235733770892078245

विविध गटांतील स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेने विविध रंगांनी कॅनव्हास सजवले आणि परीक्षकांची व उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा उत्कृष्ट वापर करत विविध सामाजिक,सांस्कृतिक आणि पर्यावरणीय संकल्पना चित्रांच्या माध्यमातून साकारल्या. रंगांचा सुरेख समन्वय, स्वच्छ रेखाटने व आशयगण कल्पना यामुळे चित्रांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः उपस्थित राहत मुलांच्या कलागुणांची प्रशंसा केली. यावेळी विजेत्यांना व सहभागी स्पर्धकांना त्यांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे  प्रदान करण्यात आली, तसेच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी चंद्रकांत पाटील यांनी महेश पवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.

Fb img 17519814063855169877240686737724
Fb img 17519814109704844219650763017560

यावेळी माजी नगरसेवक शिवराम मेंगडे, मंडल अध्यक्ष कुलदिप सावळेकर, नगरसेवक सुशील  मेंगडे, डॉ. संदीप बुटाला,  आशिषजी कांटे, बाप्पु मेंगडे, हेमंत बोरकर, निलेश म्हस्कुले, तुषार विसपुते, राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल गोणते  उपस्थित होते.

Img 20250704 wa00173607138186167183613
Img 20240404 wa0013282293280934616164697357

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये