पुणे शहर

शाळा कॉलेजच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी पुणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

पुणे : पुणे शहरात अलीकडच्या काळात वाढत असलेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांना वेळीच आळा बसावा, या मुलींची शाळेत व शाळेच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात यावी,या मागणीसाठी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने भेट घेत निवेदन देण्यात आले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कांबळे, विद्यार्थी शहराध्यक्ष विक्रम जाधव, विद्यार्थी शहर कार्याध्यक्ष शुभम माताळे उपस्थित होते.

” मुलींवरील अत्याचाराच्या ज्या घटना घडल्या आहेत त्या घटनांबाबत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व या घटनांमध्ये ज्या शिक्षणसंस्थांनी मुलींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केला आहे ,त्यांच्यावर कठोर कार्यवाही व्हावी. शाळा कॉलेजच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी  पुणे शहरातील प्रत्येक शाळा व कॉलेजमध्ये CCTV बसवणे सक्तीचे करावे व यांचे दरवर्षी ऑडिट व्हावे”. या सर्व मागण्यांचे निवेदन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिले.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये