अर्थजगत

STOCK MARKET : सेन्सेक्समध्ये 450 अंकाची घसरण; गुंतवणुकदारांना फटका

मुंबई : जागतिक शेअरबाजारात सध्या घसरण पहायला मिळत आहे. त्याचा परिणाम हा भारतीय शेअर बाजारावर देखील झाला असून, गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरूच आहे. आज शेअर बाजार सुरू होताच पहिल्याच सत्रात सेन्सेक्समध्ये 450 अंकांची घसरण झाली. तर दुसरीकडे निफ्टी देखील 120 अंकांनी घसरला.

आज शेअर बाजार सुरू होताच 30 पैकी 27 शेअर्समध्ये घसरण झाली. केवळ तीन कंपन्याचे शेअर्स तेजीत आहेत. बुधवारी बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यांच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव वाढल्याने सेन्सेक्स कोसळला तर दुसरीकडे एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, आणि टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मात्र तेजी दिसून आली. मंगळवारी शेअर बाजारात मोठी उलाढाल पहायला मिळाली होती. मंगळवारी सेन्सेक्स 776.72 अंकांच्या वाढीसह शेअर बाजार बंद झाला होता. आज देखील शेअर बाजारात तेजी राहण्याचा अंदाज गुंतवणूकदारांना होता, मात्र शेअर बाजार सुरू होताच गुंतवणूकदारांच्या अपेक्षेवर पाणी फिरल्याचे पहायला मिळाले. मंगळवारी एकीकडे भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येत होती, मात्र दुसरीकडे अमेरिकन शेअर बाजारात मंदीचे वातावरण पहायला मिळाले. अमेरिकन शेअर बाजारावर विक्रीचा दबाव वाढल्याने निफ्टीमध्ये 3.95 टक्क्यांची घसरण झाली. शेअर बाजार घसरल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढ-उतार, युक्रेन, रशिया युद्ध, वाढती महागाई अशा अनेक घटकांचा सध्या शेअर बाजारावर परिणाम होताना दिसत आहे.

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये