पुणे शहर

पुण्यात गुरूवारी नियमित पाणी पुरवठा होणार पुणे महापालिकेची माहिती; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर पाणी कपात रद्द

पुणे : गुरुवारी (दि.10) पुणे शहरातील बहुतांश भागातील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सांगितले होते. मात्र, आता गुरुवारी नियमितपणे सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंत्यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका आणि महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हि पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या वतीने पर्वती सबस्टेश येथे 220/22KV चे तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम गुरुवारी (दि.10) करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्वती जलकेंद्र (जुने व नवीन) व अखत्यारीतील लष्कर जलकेंद्र, एन.एन.डी.टी. MLR पंपींग व वडगाव जलकेंद्र येथील वीजपुरवठा बंद राहणार आहेत. त्यामुळे गुरुवारी या पंपींगच्या अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे निवदेन पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागकडून देण्यात आले होते. मात्र, आता गुरुवारी नियमित पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिकेकडून कळवण्यात आले आहे.

Img 20230803 wa00041486684870724290474

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका आणि महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हि पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. पाटील यांनी पुणे महापालिकेचे अधिकारी आणि राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या पर्वती सब स्टेशन येथील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.या चर्चेनंतर पुणे महापालिकेने गुरुवारी पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे गुरुवारी सर्व पेंपिंग स्टेशनवरील भागाचा पाणीपुरवठा नियमितपणे सुरळीत सुरु राहणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

Img 20230511 wa000228129
Img 20230717 wa0012
Img 20221228 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये