पुणे शहर

शिव छत्रपतींना अपेक्षित असलेल्या राजधर्माचे पालन सत्ता पक्षाकडून व्हावे : गोपाळ तिवारी

शिव छत्रपतींचे जन्मस्थान शिवनेरी हे राष्ट्रीय स्मारक व्हावे..!

पुणे :  हिंदूस्थानचे अराध्य दैवत, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून “रयतेच्या जनकल्याण राज्य व्यवस्थेची” स्थापना केली, त्याचा प्रत्यय शिवमुद्रेची प्रतीमा संविधानात प्रतिबिंबित होत असल्याने देशवासीयांना येतो. सत्ता पक्षाकडुन शिव छत्रपतींना अपेक्षित राजधर्माचे पालन व्हावे अशी अपेक्षा काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी व्यक्त केली.

पुणे मेडीसीन असो व डीलीव्हरी बॉईज तर्फे सदाशीव पेठेत शिवजयंती निमित्त “श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस” पुष्पहार अर्पण व अभिवादन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

Img 20240404 wa00142747383113629703933

तिवारी म्हणाले, उत्तम राज्यकारभाराचा आदर्श जगासमोर ठेवणारे,  प्रजाहितदक्ष व लोककल्याणकारी राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज होते. सत्ता पक्षाने, शिवाजी महाराजांना अपेक्षीत ‘रयते प्रती, महीला – भगींनींचे प्रती, सुरक्षा पुरवुन व बळीराजा शेतकऱ्यां प्रती त्यांच्या पिकास योग्य भाव देण्याचा व राजकीय उत्तरदायीत्वाचा कृतीशील राजधर्म निभवण्याची आज गरज आहे. तरच ते शिव छत्रपतींना खरोखरचे अभिवादन व खरी सुमनांजली ठरेल. पुणे जिल्ह्यातील शिव छत्रपतींचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हे राष्ट्रीय स्मारक व्हावे.. अशी मागणी देखील तिवारी यांनी यावेळी केली. 

या प्रसंगी संयोजक प्रसन्न पाटील, पप्पू शेठ गुजर, डॉ शैलेश गुजर, संजय अप्पा बिबवे, अनिल पाटोळे, भंडारे, दिवाकर , राठी, धनंजय भिलारे, गणेश शिंदे, ॲड. स्वप्नील जगताप व मेडीसीन डीलीव्हरी बॉईज मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Img 20250220 wa02431405181935538044720
Img 20240404 wa0013281293529802052601663206

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये