पुणे शहर

समस्त गावकरी युवा मंच कोथरुड या वेळेस साजरा करणार डीजे विना ग्राम उत्सव

पुणे : कोथरुडचे ग्राम दैवत म्हातोबा देवाचा उत्सव हनुमान जयंतीच्या दिवशी साजरा होत असतो. पुर्वी ग्राम उत्सवात पंचक्रोशीतून पारंपारिक ढोल लेझिम पथक आपले खेळ सादर करायला येत असत. मधल्या काळात यात खंड पडला. या वर्षी कोथरुड मधील सर्व युवा ग्रामस्थांनी आणि सर्व  गणपती मंडळांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे.

उत्सव साजरा करताना सर्व मताने उत्सव हा डीजे न लावता पारंपारिक पद्धतीने साजरा करायचा ठरविला आहे . त्या प्रमाणे पंचक्रोशीतून ढोल लेझीम पथक आपले खेळ सादर करण्यासाठी आमंत्रित केले आहे.आपण सर्वांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन समस्त गावकरी युवा मंच कोथरुड तर्फे करण्यात आले आहे.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये