हॉलिडेज पॅकेज प्रकरणात व्याज व नुकसानभरपाई सह रक्कम परत करण्याचे आदेश; ग्राहक आयोगाचा दणका

पुणे: भाग्यवान विजेते ठरल्याचे सांगून महिलेस व तिच्या पतीस बक्षीस देत त्यांना हॉलिडेज पॅकेज देणाऱ्या कंपनीचे सभासदत्व घेतल्यास प्रवासात सवलत देण्यात येईल असे सांगून ते न दिल्याप्रकारनी गो लेईजर इंटरनॅशनल हॉलिडेज प्रा. ली. कंपनी व तिचे संचालक यांना ग्राहक आयोगाने दणका दिला आहे.
तक्रारदाराला सभासदत्व करिता आकारलेले रु. 90,000 दिनांक 23/02/2019 पासून 8% व्याज दराने 45 दिवसात परत करण्याचे आदेश आयोगाने दिले आहे. याच बरोबर नुकसान भरपाई साठी रु. 30,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 5,000/- देण्याचे आदेश आयोगाने दिले आहे.

याबाबत तक्रारदार यांनी ऍड. पवनकुमार भन्साळी यांच्या मार्फत गो लेजर इंटरनॅशनल प्रा. ली. व त्यांचे संचालक यांच्या विरुद्ध तक्रार अति पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या कडे दाखल केली होती. तक्रारदार पिंपरी चिंचवड येथील बिग बाजार येथे खरेदी साठी गेले असता त्या ठिकाणी लकी ड्रॉ चे कुपन भरले. नंतर त्या कुपन मध्ये बक्षीस मिळाल्याचे सतत कंपनीचे फोन येऊ लागल्याने तक्रारदार बक्षिस घेण्यास तेथे गेल्यावर त्या ठिकाणी त्यांना हॉलिडेज ट्रिप व त्यातील सवलत याबाबत माहिती दिली आणि तक्रारदार याना सभासद होण्यास सांगितले व लगेच 90,000/- तक्रारदार यांच्या कडून घेतले सोबत दिलेले कुपन तक्रारदार यांना कोणतीही पूर्व सूचना न देता सदरची कुपन रद्द करून आपले ऑफिस सुद्धा बंद केले.
म्हणून पोलीस स्टेशन ला तक्रार दिली परंतु काहीही उपयोग न झाल्यामुळे तक्रारदार यांनी ऍड. पवनकुमार भन्साळी व ऍड. राघव लाहोटी यांच्या मार्फत सदरची केस चालविली. त्यामध्ये दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकून अति. पुणे जिल्हा ग्राहक आयोगाच्या अध्यक्ष जे.व्ही. देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे, अनिल ब. जवळेकर यांनी वरील प्रमाणे आदेश देऊन कंपनीला दणका दिला आहे.



