खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला दुबईमध्ये महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद.

संस्कृती मराठी मंडळाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दुबईमध्ये दिनांक ३ सप्टेंबर रोजी खास महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर चंद्रशेखर जाधव,अभिजित देशमुख, सचिन कदम, नितीन जाधव, ज्योती सावंत यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आली.
पैठणीच्या खेळासाठी एकूण ६१ महिलांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला. दुपारी दोन वाजता सुरु झालेली स्पर्धा संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू होती. चमचा लिंबू, फुगा फुगवून खुर्चीत फोडणे, तळ्यात मळ्यात, फूग्याने पेपर कप जमा करणे, स्ट्रॉ च्या साहाय्याने थर्माकोल चे गोळे जमा करणे अशा प्रकारचे वेगवेगळे वैयक्तीक खेळ घेऊन खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्यात आले. अंतिम फेरीत पोहचलेल्या पाच महिला स्पर्धकांमध्ये झालेल्या स्पर्धेत सौ. शितल ढमाले कदम यांना मानाची पैठणी पेशवा रेस्टॉरंट च्या संचालिका सौ. श्रेया जोशी यांच्या हस्ते देण्यात आली.

द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या सौ. रश्मी साळुंखे यांना यास गोल्ड चे संचालक श्री. सचिन कदम यांच्या हस्ते सोन्याची नथ देण्यात आली. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सौ. माधुरी पाटिल यांना Re Take च्या संचालिका सौ. प्रिया चिल्लाळ यांच्या हस्ते iPad देण्यात आला. चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी सौ. अर्चना बोंडगे यांना ग्रीन प्रिफॅब च्या संचालिका सौ. रेखा घोरपडे आणि वेदाज टेक्निकल सर्व्हिसेस च्या संचालिका सौ. जाई सुर्वे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसेच पाचव्या क्रमांकाची ट्रॉफी सौ. प्रियंका डांगरे यांना ईलाईट ग्रुप चे भागिदार श्री. संदिप पवार यांच्या हस्ते देण्यात आली.



कार्यक्रमाला पेशवा रेस्टॉरंट, यास गोल्ड, Re Take, अल माहीर प्रिंटिंग, मीना ज्वेलर्स, अकिरा ट्रॅव्हल्स, एवेन्यू पर्ल इव्हेंट, फोकस ऑटो, डॉ. नरेंद्र मुरपाणी, डे मेरिडियन, ग्रीन प्रीफॅब, अर्पण फ्लॉवर्स, मुंबई अरोमा, टेसला प्रॉपर्टीज, जेकेव्ही, क्षण फोटोज, डीजे निकिन हे प्रायोजक म्हणून लाभले.
सौ. ज्योती सावंत, सौ. दिपाली डाके, सौ. भाग्यश्री वेंगुर्लेकर, सौ. ज्योती चव्हाण यांनी कार्यक्रमाचे यू ट्यूब प्रसारण केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे आधारस्तंभ श्री मंदार कुलकर्णी, श्री. किशोर मुंढे, श्री मनोज बागल, श्री. अमित मोरे आणि मंडळाच्या सर्व सभासदांनी हातभार लावला.





