पुणे शहर

कोरोनामुळे बेरोजगारीचे संकट कोसळलेल्यांना रोजगाराची संधी ; चंद्रकांत पाटील यांचा मदतीचा हात

पुणे : Pune city कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून, त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी पुन्हा एकदा ‘एक हात मदतीचा’ पुढे केला आहे. पुणे शहर भाजपा उद्योग आघाडीच्या माध्यमातून कोरोनामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेल्या १०० जणांना दोन महिन्याचा रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्यापैकी आज पहिल्या टप्प्यात 20 जणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. Employment opportunities for those unemployment  affected by the Corona situation

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकारने कोणतेही नियोजन न करता, लॉकडाऊन लागू केला. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळे त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी पहिल्या लाटेनुसार, दुसऱ्या लाटेतही चंद्रकांत पाटील यांनी ‘एक हात मदतीचा’ पुढे केला आहे.

Img 20210707 wa0004

पुणे शहर उद्योग आघाडीच्या माध्यमातून सेल्स अँड मार्केटिंग, ब्युटी पार्लर, वृद्ध सेवा, अॅम्ब्यूलन्स सेवा, पॅकेजिंग, ऑफिस अॅसिस्टन्ट यांसह विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. यानुसार एकूण 100 जणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असून, आज त्यापैकी 20 जणांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन, त्यांचे प्लेसमेंट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमाच्या माध्यमातून 18 वर्षावरील विशेष मुलांना देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

दरम्यान, या उपक्रमाच्या माध्यमातूनही अजूनही 80 जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असून, याचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी bjpbusinesscellpune@gmail.com किंवा http://forms.gle/zGvtYsbzjyBM6vVT6 या गुगल फॉर्मवर आपली माहिती भरुन पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये