पुणे शहर

पुणे शहरात विविध ठिकाणी असलेले साहित्यीक कट्टे सुरू करा : दिपाली धुमाळ..

पुणे : pune city विविध उद्यानांमध्ये व विरंगुळा केंद्रामध्ये पुणे महापालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीच्या वतीने सुरू असलेले साहित्यीक कट्टे मागील काही महिन्यांपासून कोरोना संकटामुळे बंद आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने सर्व गोष्टी सुरू होत आहेत, त्यामुळे  हे साहित्यिक कट्टे ही सुरू करण्यात यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

याबाबत दिपाली धुमाळ यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांना पत्र दिले आहे. या साहित्यिक कट्टाच्या माध्यामातुन नवोदित साहित्यीक लेखक, कलावंत, कवी, यांना मुक्त व्यासपीठ निर्माण करुन देण्यात आलेले आहे. या साहित्यीकांच्या माध्यमातुन मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी व अनेक साहित्यीक लेखक, कवी व कलावंत निर्माण करण्याच्या दुष्टीकोनातुन उपयोग होत आहे.

गेल्या कोरोनाच्या दिड वर्षाच्या कालावधीत हे सर्व साहित्यीक कट्टे बंद होते. परंतु आता महाराष्ट्र सरकारने उद्याने व सार्वजनिक विरंगुळा केंद्र, नाट्यगृह व सिनेमागृह सुरु करण्याच्या संदर्भात सुचना दिलेल्या आहेत. याच दुष्टीने हे साहित्यीक कट्टे सुध्दा सुरु करणे गरजेचे असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.

Img 20211005 wa0014

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये