सिंहगडावरील खंद कडा भागात स्वराज्याच्या शिलेदारांनी केली स्वच्छता मोहीम

कर्वेनगर : स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान तर्फे सिंहगडावर अनेक वर्षे संवर्धनाच काम चालू आहे त्यातुनच प्रतिष्ठान च्या वतीने रविवारी गडावरील खंद कडा भागात गवत काढणी मोहीम राबवण्यात आली. यामध्ये सिंहगडावरील खंद कड्याच्या आजुबाजुला तटबंदी व बुरुजावर वाढलेले गवत व झाडी काढण्यात आली.
प्रतिष्ठान कडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा विडा उचलण्यात आला आहे. त्यानुसार विविध गड किल्ल्यांवर जाऊन संवर्धनाची मोहीम राबवण्यात येत असते. प्रतिष्ठानचे सदस्य हिरहिरिने या मोहिमेत सहभागी होऊन गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पडेल ते काम उत्साहात करत असतात.

गेली सहा महिने लाकडाऊन असल्याने सिंहगडावर पर्यटक बंदी होती त्यामुळे पर्यटक भेटी देण्यासाठी येत नव्हते. त्यामुळे गडावर मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. हे वाढलेले गवत टप्प्या टप्पाने काढण्यात येणार आहे, काही दिवसात पर्यटन बंदी उठेल आणि गड किल्ले सुरू होतील, पुणेकरांचा सिंहगडकडे अधिक ओढा असतो, त्यामुळे सिंहगडला भेटी देण्यासाठी पर्यटक येतील. त्या अगोदर पर्यटकांना सिंहगड किल्ला नीट पाहता यावा यासाठी मोहीम हाती घेतली आहे. अशी माहिती प्रतिष्ठान तर्फे देण्यात आली. मोहिमेची सुरूवात खंद कड्यापासुन करण्यात आली आहे.



प्रतिष्ठानचे मंगेश नवघणे म्हणाले, सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये गडकिल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने दरवर्षी वास्तु , तटबंदी, बुरूज यावर गवत व झाडे उगवतात. पुर्वीच्या काळी विषेश तरतुदी केल्या जायच्या पण आता ते कोणी करत नाही म्हणून स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानने ही गवत काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.
यावेळी प्रतिष्ठानचे अभिजित शिंदे, अविनाश चोरगे, मंगेश नवघणे , अनिल कडु, स्वहित कळंबटे, निखिल चोरगे हे मोहिमेत सहभागी झाले होते.









