सिनेजगत

सुप्रसिद्ध अभिनेते असरानी यांचं  निधन

मुंबई – ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं असून संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ते अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. दुपारी ४ वाजता त्यांचे निधन झाले. ५० वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या काही कलाकारांपैकी असरानी एक होते.

फुफ्फुसांच्या आजारामुळे गेल्या पाच दिवसांपासून असरानी यांना आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अभिनेत्याचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी असरानी यांच्या मृत्यूची बातमी सांगितली आणि म्हणाले की, असरानी अनेक दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. संध्याकाळी सांताक्रूझमधील शास्त्री नगर येथे त्यांच्या जवळचे लोक आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Fb img 17609598297903329446613329696146

असरानी यांच्या अकाली निधनानं चाहते आणि कलाकारांनाही धक्का बसला आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. असरानी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे झाला. त्यांनी जयपूरमधील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर राजस्थान कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. १९६७ मध्ये ‘हरे कांच की चुडियाँ’ या चित्रपटाद्वारे असरानी यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. असरानींच्या सर्वात संस्मरणीय भूमिकांपैकी, ‘शोले’ चित्रपटातील जेलरची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या चित्रपटातील त्यांचा डायलॉग, ‘हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं’ खूप प्रसिद्ध झाला आणि दशकांनंतरही लोक अजूनही या डायलॉगसाठी असरानींना ओळखतात. असरानी यांनी ‘धमाल’, ‘ढोल’, ‘बालिका वधू’, ‘हेरा फेरी’, ‘मालामाल विकली’, ‘हेरा फेरी ३’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

१९७३ मध्ये असरानी यांनी मंजू बन्सलशी लग्न केलं. असरानी यांना एक मुलगा असून त्याचं नाव नवीन असरानी आहे. त्यांचा मुलगा अहमदाबादमध्ये डेन्टिस्ट आहे. असरानी यांचे वडील कार्पेटचं दुकान चालवायचे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये