पुणे शहर

पुणे महापालिकेत शिवसेना ८० जागा लढविणार संजय राऊत यांची घोषणा

पुणे :  शिवसेना पक्षाकडून पुण्यातील संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. आगामी महानगरपालिकेची निवडणूक महाविकासआघाडीने एकत्र लढवली तरी शिवसेना ८० जागांवर लढेल, अशी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सध्या शिवसेना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संघटनात्मक काम करत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जनमानसातील प्रतिमा दिवसेंदिवस उंचावत आहे. असेही राऊत म्हणाले. (Sanjay Raut announces that Shiv Sena will contest 80 seats in Pune Municipal Corporation)

पुण्यातील आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकेरी राहणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ते आज (५ जून) पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना किंग आणि किंगमेकर यापैकी एक नक्कीच असणार. पुण्याकडे आमचं लक्ष आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Img 20210522 wa0207

‘चंद्रकांत पाटील म्हणजे वसंतदादा पाटील नव्हेत’, राऊतांचा टोमणा

शरद पवार यांच्यावर टीका करणे आजकाल फॅशन झाली आहे. चंद्रकांत पाटील म्हणजे वसंतदादा पाटील नव्हेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसेच, खेडमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना वादावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. सत्ता असली किंवा नसो आमच्यासाठी शिवसेना महत्त्वाची आहे. त्यामुळे जिथे शिवसेनेवर अन्याय होईल, तिथे आम्ही उभे राहणारच, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये