पुणे शहर

पुणे महापालिका निवडणूकीसाठी भाजपची जोरदार तयारी, बाकी सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत

पुणे : एकीकडे विधानसभेत महायुतीतील भाजपाला मोठे यश मिळाल्याने आता पुणे महानगर पालिकेत पुन्हा सत्ता आणण्याची जोरदार तयारी एकीकडे भाजपाने सुरु केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाने स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरु केली आहे. गेली अडीच वर्षे पुणे महानगरपालिकेत प्रशासक असल्याने पुणेकरांच्या नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष झालेले आहे. भाजपाला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत १३२ हून अधिक जागा मिळाल्याने भाजपाचा आत्मविश्वासात वाढ झालेली आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकात मोठे विक्रमी बहुमत मिळाल्याने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांकडे सर्व पक्षाचे लक्ष लागले आहे. भाजपला राज्यात मोठे यश मिळाल्याने भाजपाने पुणे महानगर पालिका निवडणूका जिंकण्याची मोठी तयारी केली आहे.

Img 20241211 wa00096060701689709718462

पुणे शहरातील विधानसभेत भाजपाने ५० हजार भाजप सदस्यांच्या नोंदणीचे लक्ष्य ठेवले आहे. तर शहरातील प्रत्येक प्रभागात दहा हजार भाजपाचे सदस्य नोंदणीचे लक्ष्य आहे. महापालिका निवडणूकीसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघात निरीक्षक नियुक्त केले जाणार आहेत. पुणे शहर भाजपा यासाठी लवकरच प्रभाग निहाय बैठका घेणार आहे.

Img 20241212 wa00042689993044752604309

आमदार हेमंत रासने यांनी प्रतिक्रीया दिलेली आहे. विधानसभा निवडणूकांच्या निकालानंतर भाजपाने महापालिका निवडणूकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांकडून कोणतीही तयार होताना दिसत नाही.महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला एकत्र सामोरे जायचे की स्वबळावर महापालिका निवडणूक लढवायची यावर महाविकास आघाडीत अजूनही एकमत होताना दिसत नाही


पुणे महापालिका पक्षीय बलाबल – 2017

भाजप 99

काँग्रेस 09

राष्ट्रवादी 44

मनसे 2

सेना 9

एमआयएम 1

Img 20241020 wa00013699867278209296534

आमची स्वबळावर निवडणूका लढायची तयारी असली तरी महाविकास आघाडीत एकमेकांचा मान सन्मान राखला गेला पाहिजे, अन्यथा स्वबळावर निवडणूका लढण्याची तयारी आम्ही ठेवलेली आली आहे असे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.कॉंग्रेसने जर महाविकास आघाडीत पुणे महापालिका एकत्र लढविण्याचे ठरले नाही तर आम्ही देखील स्वतंत्रपणे लढण्याची तयारी ठेवल्याचे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी म्हटले आहे.

Img 20240404 wa00142747383113629703933

दुसरीकडे उद्धव ठाकरे गट आणि मनसेकडून देखील महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे, राज ठाकरे स्वतः जातीने महापालिका निवडणुकीत पुण्याकडे लक्ष देणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या घोषणेच्या प्रतीक्षेत आहेत. आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक विधानसभा निवडणुकीपेक्षाही अधिक चुरशीची होणार यात शंका नाही असे म्हटले जात आहे.

Img 20240404 wa0013281293529802052601663206

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये