पुणे शहर

कोथरुड मधील पूरग्रस्तांना चंद्रकांत पाटील यांचा मदतीचा हात

पुणे : पुणे जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस होत असल्या कारणाने खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरातून वाहणाऱ्या  मुठा नदीला पूर आला. यामुळे नदी काठच्या असंख्य कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावं लागलं.

कोथरुड मधील रजपूत वीटभट्टी आणि खिल्लारे वाडी परिसराला ही पूराचा फटका बसला. त्यामुळे अनेकांना तातडीने स्थलांतरित करण्याची आवश्यकता होती. स्थानिक आमदार व उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मधील भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना तातडीने नदी काठच्या कुटुंबाना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याच्या सूचना देऊन, त्यांची राहण्यासह जेवण आणि इतर आवश्यक वस्तूंची पुर्ताता करुन सर्वप्रकारची व्यवस्था केली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या कार्यतत्परतेमुळे कोथरूड मधील पूरग्रस्त जनतेला दिलासा मिळाला आहे.

Fb img 16474137314571819310932637888379

दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्यातील घाट माथ्यावर सर्वत्र अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने ही सर्वांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडूनही मदत कार्य सुरु आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते मदत कार्य करत आहेत. नागरिकांनीही योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Img 20240404 wa00123413096165072096535
Img 20240404 wa00134916733315783821383

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये