कोथरुड

कोथरूड, कर्वेनगर, वारजेमधील हे ४ आहेत कंटेनमेंट झोन…

कर्वेनगर : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून शहरात कोरोना बाधीत रुग्ण वाढीचा दर वाढलेला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज पुणे शहरात ४२ कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले असून त्याठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या ४२ कंटेनमेंट झोनमध्ये कोथरूड, कर्वेनगर, वारजे मधील ४ कंटेनमेंट झोन चा समावेश आहे. There are 4 containment zones in Kothrud, Karvenagar, Warje …

Img 20210303 wa0015

वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १. स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरुड २. लक्ष्मी नारायण नगर सोसायटी, पटवर्धन बागेसमोर, ३. ए जे क्लासिक, राजाराम पुला शेजारी, ४.  आदित्य गार्डन सिटी सोसायटी वारजे माळवाडी हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टंसिंग, हॅण्ड सॅनिटायजेशन या गोष्टींवर भर द्यावा तसेच  दिलेल्या नियमांचे व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त संतोष वारुळे यांनी केले आहे.

Img 20210223 wa0156

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्यामुळे आता महानगरपालिकेने कठोर पावले उचलली आहेत. त्यासाठी पुण्यातील 10 क्षेत्रीय कार्यालयांच्या विभागात 42 कंटेनमेंट झोन निश्चित करण्यात आले. आहेत. यामध्ये हडपसर परिसरात सर्वाधिक पाच कंटेनमेंट झोन आहेत. त्यामुळे हडपसर परिसर सध्या पुण्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरताना दिसतोय. पुणे महानगरपालिकेकडून यासंदर्भात अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मोठ्या इमारतींमध्ये रुग्ण सापडल्यास ती संपूर्ण इमारत सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये