महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी तरुणांचा ५८० किमीचा पायी प्रवास ;उध्दव ठाकरे यांनी घेतली भेट

मुंबई : उमरगा ते मुंबई असा ५८० किलो मीटरचा पायी प्रवास करून आलेल्या मराठा तरुणांची भेट घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांना आरक्षणासंदर्भात शासन करत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासन सर्वोच्च  न्यायालयात सर्व सामर्थ्याने लढा देत असून हे सरकार तुमचेच असून तुमच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ठाकरे यांनी त्यांना सांगितले .

Img 20201028 wa0145

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी या तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी  उमरगा तालुक्यातील बाळासाहेब माने, पंकज जगताप, अक्षय गायकवाड, साहेब जाधव, नितीन जाधव आणि विश्वजीत चुंगे  या युवकांनी उमरगा ते मुंबई असा  ५८० कि.मी चा प्रवास पायी केला. यासाठी त्यांना १३ दिवस लागले.

Img 20201024 wa0166 1

आज त्यांनी  मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आपले निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये