ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत कॉन्गोच्या पंक्तीत

नवी दिल्ली : ग्लोबल हंगर इंडेक्स २०२२ मध्ये भारताची सहा स्थानांनी घसरण झाली आहे. भारत आता १२१ देशांच्या यादीत १०७ व्या स्थानावर आहे. या यादीमध्ये दक्षिण आशिया देशात अफगाणिस्तान वगळता अन्य सर्व देश भारताच्या पुढे आहेत. बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका या सर्व देशांना भारतापेक्षा चांगले रँकिंग मिळाले आहे. हंगर इंडेक्समध्ये भारत आता झाम्बिया, सिएरा लियोन, लायबेरिया, हैती, रिपब्लिक ऑफ कॉन्गो या देशांच्या पंक्तीत आहे.

वेगवेगळ्या NGO स्वत:चा हंगर इंडेक्स तयार करत असतात. या शिवाय जागतिक आरोग्य संघटना देखील हंगर इंडेक्स तयार करते. आता जो हंगर इंडेक्स आला आहे तो NGOs- Concern Worldwide आणि Welthungerhilfe मिळून तयार केला आहे. हा रिपोर्ट तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्र, युनिसेफ आणि फुड and अग्रीकल्चर ऑर्गनायजेशनसह अन्य संघटनांचा डेटा वापरला जातो.



ग्लोबल इंगर इंडेक्स तयार करण्यासाठी WHO तीन गोष्टींचा विचार करते. यात अन्नधान्याची कमी, मुलांचे कमी पोषण आणि बाल मृत्यू या गोष्टींचा विचार केला जातो. तर NGOs- Concern Worldwide आणि Welthungerhilfe हे अंडरनरिशमेंट, चाइल्ड स्टंटिंग, चाइल्ड वेस्टिंग आणि चाइल्ड मॉर्टलिटी म्हणजेच अल्पपोषण, कुपोषण, अपुरी वाढ आणि बालमूत्यू या आधारावर इंडेक्स तयार करते.



